खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:56+5:302021-01-02T04:24:56+5:30
अंचलेश्वर बस नियमित सोडण्याची मागणी चंद्रपूर : येथून अंचलेश्वर गेट ते बल्लारपूरपर्यंत जाणाऱ्या बसेस वेळेवर जात नसल्याने प्रवाशांना ...

खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी
अंचलेश्वर बस नियमित सोडण्याची मागणी
चंद्रपूर : येथून अंचलेश्वर गेट ते बल्लारपूरपर्यंत जाणाऱ्या बसेस वेळेवर जात नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शाळा सुरु असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे
.
अपुऱ्या बसफेऱ्यांनी प्रवासी त्रस्त
जिवती : जिवती तालुक्यातील अनेक गावातून बसफेऱ्या जात नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोेंड द्यावे लागत आहे. या तालुक्यात नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथील बसेस मात्र जिवती तालुक्यात नियमित येत आहेत.
मिलन चौकात सिग्नल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील मिलन चौकात सिग्नल सुरु करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याकडे महानगरपालिका व वाहतूक विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. काही दिवसापूर्वी शहरातील इतर चौकामध्ये सिग्नल सुरू करण्यात आले. मात्र येथील सिग्नल सुरु करण्यात आले नसल्याने या चौकात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
शासकीय कार्यालयात तक्रारपेट्याची मागणी
गोंडपिपरी : शासकीय कार्यालयातील कामकाज व कर्मचाऱ्यांबाबत अनेकांच्या तक्रारी असतात. काही व्यक्ती त्या प्रत्यक्ष सांगू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक कार्यालयात तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र तक्रारपेट्या गायब असल्याने पुन्हा लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उपरी-पेठगाव रस्त्याची दुरुस्ती करावी
सावली : तालुक्यातील उपरी ते भान्सी-पेठगाव रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाले असल्याने वाहन चालविताना मोठी अडचण जात आहे. त्यामुळे दुरुस्ती करण्याची मागणी आहे.
प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी
ब्रह्मपुरी : शहरातील वर्षानुवर्षे रखडलेल्या मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली जात आहे. विद्यानगरी म्हणून ब्रह्मपुरी शहराची ओळख सर्वदूर आहे. मात्र शहरातील समस्या अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषद अस्तित्वात आली. तेव्हापासून समस्या जटील व गुंतागुंतीच्या होत गेल्या, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
आधारकार्ड अपडेटसाठी अडचण
चंद्रपूर : सामान्य माणसाचा अधिकार म्हणून ‘आधार कार्ड’ला ओळखले जाते. आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.