घुग्घुसला अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST2021-08-20T04:31:49+5:302021-08-20T04:31:49+5:30
घुग्घुसला १७ ऑगस्ट १९९९ ला तात्पुरते नायब तहसीलदार सुरू करण्यात आले. मात्र या कार्यालयाला कायमस्वरूपी प्रशासकीय मंजुरी व कायमस्वरूपी ...

घुग्घुसला अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी
घुग्घुसला १७ ऑगस्ट १९९९ ला तात्पुरते नायब तहसीलदार सुरू करण्यात आले. मात्र या कार्यालयाला कायमस्वरूपी प्रशासकीय मंजुरी व कायमस्वरूपी नायब तहसीलदार मिळाले नाही. चंद्रपूर कार्यालयाचे नायब तहसीलदार कारभार सांभाळत होते. गेल्या पाच वर्षापासून कागदोपत्री नायब तहसीलदाराची नियुक्ती आहे तर ते फक्त स्वातंत्रदिन व गणराज्य दिनी ध्वजारोहणाकरिता येतात व जातात. कार्यालयीन कामकाजाकरिता घुग्घुस व ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना चंद्रपूर कार्यालय गाठून कामकाज करावे लागते. येथील औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या लक्षात घेता घुग्घुसला कायमस्वरूपी अप्पर तहसीलदार कार्यालय देण्याची नितांत गरज आहे, असे निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले आहे.