महिला कॉग्रेस कमेटीतर्फे धरणे आंदोलन
By Admin | Updated: June 23, 2016 00:37 IST2016-06-23T00:37:10+5:302016-06-23T00:37:10+5:30
जिल्हा महिला कांग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी स्थानिक प्रियदर्शनी चौक येथे वाढती महागाईचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

महिला कॉग्रेस कमेटीतर्फे धरणे आंदोलन
चंद्रपूर : जिल्हा महिला कांग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी स्थानिक प्रियदर्शनी चौक येथे वाढती महागाईचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून महगाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. त्यातच पाण्याचे बिल, घर टॅक्स, लाइट बिल यामध्ये प्रंचड वाढ करण्यात आली. वाढती माहागाई कमी करण्यात यावी, यासाठी महिला कांग्रेसने भाजप सरकारचा निषेध करत संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी धरणे आंदोलन केले.
सदर आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागड़े यांनी केले. यावेळी महिला कॉग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ रजनी हजारे, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता अग्रवाल, अनिता कथडे, वंदना भागवात, कुंदा गायकवाड, ज्योती मकासरे, मीनाक्षी गुजरकर, प्रतीक्षा शिडाम आदी महिला कांग्रेसचे पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी )