शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

व्याहाड येथील मुरुम, गिट्टी उत्खनन लीज रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: October 10, 2015 00:10 IST

सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून गावालगत असलेल्या डोंगरावरील वैध व अवैध उत्खनन लिज रद्द करण्याची मागणी रेटून धरली आहे.

नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर : खनिज निधीतून गावाला वगळलेउपरी : सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून गावालगत असलेल्या डोंगरावरील वैध व अवैध उत्खनन लिज रद्द करण्याची मागणी रेटून धरली आहे. तसेच गावातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.व्याहाड (बुज) हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. येथे शाळा, कॉलेज, बँक, दवाखाना असे अनेक शासकीय कार्यालये आहेत. मुख्य म्हणजे व्याहाड बुज गावाच्या सभोवताल डोंगराने व्यापले असल्याने नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. मात्र ३० वर्षांपासून येथील डोंगरावर वैध व अवैध खोदकाम करून अवैधरित्या मुरुम गिट्टी वाहतूक केली जात आहे. यामुळे डोंगरी परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. खनिज विभागाने व्याहाड (बुज) च्या डोंगरावर खोदकामासाठी परवाना दिला असल्याने या डोंगराचे खोदकाम होत आहे. परिणामी व्याहाड (बुज) ला लाभलेली निसर्गाची ओळख नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खनिज विभागाने येथील लिज रद्द करावी, आणि गावात जिल्हा परिषदेचे कर्मचारी मुख्यालय राहावे यासाठी ग्राम पंचायतने ठराव घेवून संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देवून मागणी केली आहे.३० वर्षांपासून व्याहाड (बुज) येथे वैध, अवैध रित्या गिट्टी, मुरुमाचे उत्खनन होत आहे. परंतु अजूनपर्यंत व्याहाड (बुज) ग्राम पंचायतीला गौण खनिज विकास निधी मिळालेला नाही. तो निधी संबंधित विभागाने द्यावा, अशी मागणी सरपंच शिला पाटील, उपसरपंच योगेश बोमनवार, ग्रा.पं. सदस्य अनिल देवतळे, कुकसू गेडाम, प्रिया मोटघरे, वर्षा मोहुर्ले, सुधीर वासेकर यांनी केली आहे. (वार्ताहर)