चंद्रपूर जिल्हा दारू बंदी हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:59+5:302021-03-07T04:24:59+5:30

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून, विविध उद्योग आहेत. जागतिक दर्जाचे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. देश-विदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे ...

Demand for lifting of liquor ban in Chandrapur district | चंद्रपूर जिल्हा दारू बंदी हटविण्याची मागणी

चंद्रपूर जिल्हा दारू बंदी हटविण्याची मागणी

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून, विविध उद्योग आहेत. जागतिक दर्जाचे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. देश-विदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे हॉटेल व्यवसाय व इतर व्यवसाय चांगल्या प्रमाणात होत असतात. परंतु सन २०१५ पासून चंद्रपूर जिल्हा दारू बंदी केली आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प झालेले आहेत. ताडोबा पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात खुलेआम दारू विक्री केली जात आहे. ५० रुपयांची देशी दारू १५० रुपये प्रमाणे विक्री केली जात आहे. बोगस दारू आणि जास्तीचे पैसे जात आहे. संसार उद्‌ध्वस्त होत आहे. तरुण मुलेही दारूच्या व्यसनाकडे जात आहे. ब्राऊनशुगरसारखे अमली पदार्थसुद्धा विक्री होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. सामान्य नागरिकांनी दारू माफियांची तक्रार केल्यास धमकी देऊन मारहाण करण्याचे प्रकार घडत आहे. बोगस दारूमुळे आरोग्य धोक्यात येत असून, अवाजवी किमतीमुळे आर्थिक नुकसान होत आहे, असे वर्मा यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Demand for lifting of liquor ban in Chandrapur district