शासकीय कार्यालय व मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी

By Admin | Updated: September 7, 2015 01:12 IST2015-09-07T01:12:07+5:302015-09-07T01:12:07+5:30

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस होणारी वाढ, लाचेची मागणी, कामात दिरंगाई अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये वाढ होत आहे.

Demand for installing CCTV cameras in government offices and main roads | शासकीय कार्यालय व मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी

शासकीय कार्यालय व मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी

चंद्रपूर : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस होणारी वाढ, लाचेची मागणी, कामात दिरंगाई अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये वाढ होत आहे. तरी या सर्व घटनांवर आळा घालण्यासाठी, कर्मचाऱ्यांकडून जनतेची कामे त्वरित होण्याकरिता सर्वच शासकीय कार्यालयात व मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे व त्या सर्वांचे नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात असावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मागणीची पूर्तता न केल्यास धरणे आंदोलन, रास्ता रोको, मंत्र्यांना घेराव आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी विनोद थेरे, विवेक बोरीकर, चंद्रकांत वैद्य, मंगेश चटकी, गजानन नागपुरे, अमोल बोबडे, अरविंद मासीरकर, राकेश भगत, ज्ञानेश्वर चौधरी आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Demand for installing CCTV cameras in government offices and main roads