रस्त्यावरील वाहनांना हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:36+5:302021-01-02T04:24:36+5:30
--- प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त घुग्घुस : औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन ...

रस्त्यावरील वाहनांना हटवा
---
प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
घुग्घुस : औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे कोळसा वाहतूक तसेच सिमेंट कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत आहे. या प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
---
जनावरे विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल
चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे अनेकांनी शेती करणे सोडून दिले आहे. दरम्यान, जनावरांना ठेवणेही दिवसेंदिवस कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी जनावरांची व्रिक्री करीत आहेत.
-----
ग्रामीण भागास एस. टी. सुरु करावी
चंद्रपूर : लाॅकडाऊननंतर जिल्ह्यातील बहुतांश गावातील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने बस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, काही गावात आजही बस जात नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बस सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
----
घर बांधणीला वेग
चंद्रपूर : मागील वर्षी मार्चपासून लाॅकडाऊन करण्यात आले. दरम्यान, सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम झाला होता. यातून घरबांधणीलाही ब्रेक लागला होता. दरम्यान, सध्या चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागात घरांची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, साहित्याच्या वाढलेल्या दरामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. त्यातच रेती मिळत नसल्याने अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे रेती घाटांचा लिलाव करण्याची मागणी करण्यात आली आहे.
---