शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग निर्मितीला विलंब

By admin | Updated: June 28, 2015 01:56 IST

नागपूर- ब्रह्मपुरी- आरमोरी या राज्य मार्गाने आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूर झाले आहे.

बायपाससाठी राजकीय दबाव : शेतकऱ्यांची नुकसान होण्याची शक्यताब्रह्मपुरी : नागपूर- ब्रह्मपुरी- आरमोरी या राज्य मार्गाने आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूर झाले आहे. रस्त्याच्या डागडूजी बद्दल सांगितले असता संबंधित विभागाचे उत्तर असते की, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला असल्याने आम्ही काम करु शकत नाही तेव्हा एक तर राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असेल तर कामाला विलंब होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी केली जात आहे.नागपूर- उमरेड- भिवापूर- नागभीड- ब्रह्मपुरी- आरमोरी या मार्गाचे राज्यमार्ग रुपांतरित राष्ट्रीय महामार्ग ३५/३/डी होणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीत अनेक व्यावसायिकांच्या इमारती व काही प्रमाणात शेतजमिनी जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच काही राजकीय पुढाऱ्यांनी दबाव टाकून त्याऐवजी बायपास रोड बनविण्याविषयी योजना आखली जात असल्याने महामार्गाच्या कामाला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. बायपास रोड काढताना अनेक शेतकऱ्यांच्या उपजिवेकेचे साधन असलेल्या शेतजमिनी जाणार असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचेही बोलले जात असल्याने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात यावी असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे. या राष्ट्रीत महामार्गाच्या कामासाठी रुंदीकरण सर्वेक्षण व अंदाजपत्रकात पुल, वळण, बायपास संबंधी पूर्ण माहिती सादर केली असून उमरेड, भिवापूर, नागभीड, ब्रह्मपुरी, आरमोरी मार्ग आता चार पदरी होणार आहे. गावाबाहेर राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण मध्यापासून २२ मिटर राहणार आहे. परंतु गावात याच नियमाने घेतल्यास अनेक व्यवसायीक कॉम्प्लेक्स, इमारती अतिक्रमणात येत असल्याने त्या हटविण्यात येणार असल्याने काही व्यावसायिकांना भिती निर्माण झाली आहे.परंतु राजकीय दवाब टाकून गावाच्या बाहेरुन बायपास काढण्याच्या हालचाली सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धनशक्तीचाही वापर होत असल्याचे बोलले जात आहे. आपल्या पक्या इमारती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींमधून बायपास काढण्याचा मनसूबा रचल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची वेळ येणार असल्याने शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. रस्ता शहरातूनच व्हावा, अशी सामान्य जनतेची भावना आहे. (तालुका प्रतिनिधी)