जिल्हा परिषदेने पुरविले निकृष्ट साहित्य
By Admin | Updated: August 17, 2014 23:04 IST2014-08-17T23:04:47+5:302014-08-17T23:04:47+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या बैलबंड्यांचे वजन ३० ते ४० किलोने कमी असून जिल्हा परिषदेने १३ हजार पाचशे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निकृष्ट बैलबंड्या खरेदी करून

जिल्हा परिषदेने पुरविले निकृष्ट साहित्य
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या बैलबंड्यांचे वजन ३० ते ४० किलोने कमी असून जिल्हा परिषदेने १३ हजार पाचशे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निकृष्ट बैलबंड्या खरेदी करून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची लूट होत आहे. त्यामुळे ६ कोटी ५० लाखांच्या निकृष्ठ साहित्य खरेदीची चौकशी करण्याची मागणी आहे.
२० टक्के सेस फंडामधून यावर्षी बैलबंडी १३ हजार ५०० नग, सौर कंदिल ३ हजार नगर, तार ६ हजार ५७९ क्विंटल, ताडपत्री ५ हजार २२० नग, स्प्रे पम्प ५ हजार १० नग, विद्युत १६ हजार ५०० नग, एचडीपीई पाईप ९ हजार ४५० नग असे ६ कोटी ५० लाखांची खरेदी केली. निकषामध्ये बैलबंडीचे वजन ज्याप्रमाणे दिले आहे त्यापेक्षा ३० ते ४० किलो वजन कमी भरत आहे. काही शेतकऱ्यांनी तर सदर बैलबंडी भंगारामध्ये विकून टाकल्याचे निदर्शनात आले आहे. पुरवठा निकषामध्ये बैलबंडीचे वजन २१७.३८ किलो भरावयास पाहिजे आणि लाकडी पाट्या ४२ किलोच्या पाहिजे. परंतु यामध्ये मोठी तफावत आढळून आली असून काटेरी ताराचे वजनदेखील कमी आहे. असे असताना शेतकऱ्यांकडून अनुदान मात्र पुर्ण वसूल करण्यात येत आहे. सौर कंदील अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अनेक सौर कंदिल दोन दिवसांमध्येच बंद पडले आहे. स्प्रे पंपाबाबतसुद्धा योग्य मापक नसून या खरेदी केलेल्या साहित्याच्या पुरवठेची प्रतवारी तपासून पाहणे गरजेचे आहे.जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)