नारंडा येथील तलावांचे खोलीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST2021-04-21T04:28:05+5:302021-04-21T04:28:05+5:30
नारंडा येथे एकूण तीन तलाव असून, मागच्या वर्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लघु सिंचाई तलावाचे खोलीकरण करण्यात आले. तसेच एका ...

नारंडा येथील तलावांचे खोलीकरण करा
नारंडा येथे एकूण तीन तलाव असून, मागच्या वर्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लघु सिंचाई तलावाचे खोलीकरण करण्यात आले. तसेच एका वन तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु गावतलावाचे खोलीकरण करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे येथील पाणीसाठा हा दरवर्षी कमी असतो. तसेच वन तलावाची निर्मिती मागील वर्षी करण्यात आलेली असून त्याचेसुद्धा खोलीकरण व रुंदीकरण केल्यास पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे खोलीकरण करणे अत्यावश्यक आहे. तसेच पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास आजूबाजूच्या शेतीला त्याचा फायदा होईल. त्यांच्या शेतातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना सिंचन करण्यास मदत होईल.
सदर सर्व बाबी लक्षात घेता ग्रामपंचायत, नारंडातर्फे ताजने यांनी दालमिया सिमेंट कंपनीचे शाखा प्रबंधक सुनील भुसारी यांच्याकडे ही मागणी केलेली आहे. सदर प्रकरणावर लवकरात लवकर योग्य कार्यवाही करून यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करू, असे दालमिया सिमेंट कंपनीचे शाखा प्रबंधक भुसारी यांनी यावेळी सांगितले.