बल्लारपुरात विविध विकासकामांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST2020-12-27T04:21:31+5:302020-12-27T04:21:31+5:30
बल्लारपूर : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन पार पडले. यानिमित्त बल्लारपूर ...

बल्लारपुरात विविध विकासकामांचे लोकार्पण
बल्लारपूर : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन पार पडले.
यानिमित्त बल्लारपूर येथील नाटयगृहात आयोजित सभेत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, बल्लारपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, नगर परिषदेच्या उपाध्यक्ष मिना चौधरी, काशी सिंह, निलेश खरबडे, समीर केने, अजय दुबे, मनीष पांडे, अॅड. रणंजय सिंह, आशिष देवतळे, राजू गुंडेट्टी, राजू दारी, कांता ढोके आदी उपस्थिते होते.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या शहरातील नागरिकांच्या प्रेमाच्या बळावरच मी अनेक प्रतिष्ठेच्या पदांचा मानकरी ठरलो. बल्लारपूर शहराच्या विकासाला नवा आयाम देण्याचा मी कायम प्रयत्न केला. बल्लारपूरातील बेघर नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे.या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन अटलजींच्या जयंतीनिमीत्त संपन्न झाले. अटलजींनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिली. नाताळाच्या दिवशी अटलजींचा जन्म झाला. परस्परांमध्ये प्रेमभावना वृध्दींगत करणे हा नाताळाचा संदेश आहे. तोच संदेश अटलजींनी कायम अंगीकारला, असेही ते म्हणाले.
बल्लारपूर शहरात वीर बाबुराव शेडमाके, स्व. अरूण जेटली, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, संत तुकाराम बालोद्यान अशी चार बालोद्याने, स्व. सुषमा स्वराज ई-वाचनालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाजी मार्केट, जाकीर हुसैन वार्ड, शिवाजी वार्ड येथील नऊ सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांचे लोकार्पण तर एका ई-लायब्ररीचे भूमीपूजन यावेळी पार पडले.