शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

चंदनखेड्यातील नेहरू विद्यालयाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:30 IST

सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते.

ठळक मुद्देमुलभूत सुविधांचा अभाव : संस्थाचालक व मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनखेडा : सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते. तसेच कार्यरत मुख्याध्यापकाच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे या शाळेत अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या नावलौकीक शाळेला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे.चिमूर एज्युकेशन सोसायटी, चिमूर अंंतर्गत ही शाळा चालविली जाते. या संस्थेच्या चंदनखेडा सोबतच चिमूर, शंकरपूर, चारगाव, शेगाव बुज. येथेही शाळा आहेत. सुरुवातीचा काही वर्षांचा कालावधी सोडला तर संचालक मंडळात नेहमीच वाद झाला आहे. त्याचे पर्यवसान शाळेकडे संस्थेचे दुर्लक्ष होत गेले व दिवसेंदिवस समस्या वाढत गेल्या. परंतु, येथील समस्यांबाबत संचालक मंडळाला एकदाही लेखी पत्राद्वारे शाळेच्या समस्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न कार्यरत मुख्याध्यापकाने केला नाही. आजघडीला या शाळेची इमारत मोडकळीस व धोकादायक स्थितीत असतानाही तेथे वर्ग भरविण्यात येत आहे.छताचे कवेलू फूटल्याने पावसात छत गळत असते. खोलीत पंखे नाही, भिंतींना रंगरंगोटी नाही, मुलांकरिता संगणक संच नाही. तसेच मुला-मुलींकरिता स्वतंत्र शौचालय, मुत्रीघर नाही. खिडक्यांना तावदान नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकच असल्याने मुलांनाच शाळेची खोली व परिसर स्वच्छता करावी लागत आहे. काही वर्षांपूर्वी इमारतीची निकड लक्षात घेवून काही उत्साही शिक्षकानी पुढाकार घेतला. गावकरी व संस्थेच्या मदतीतून व्यवसायिक नाटकाचे आयोजन करुन त्यातून मिळालेल्या रक्कमेतून तथा इतर रक्मकेची जुळवाजुळव करुन एक मजली इमारत बांधण्यात आली होती. मात्र आता अनेक वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे.सुरुवातीच्या काळात शाळेतील शिक्षणाचा दर्जा होता. परंतु आजघडीला शाळेला कोणी वाली नसल्याने शाळेचा शैक्षणिक दर्जा खूप घसरला आहे. शंभर टक्के अनुदान मिळाणाऱ्या या शाळेत एकेकाळी विद्यार्थ्यांची दाटी होत होती. मात्र आता या शाळेत विद्यार्थी, पटसंख्या टिकवून ठेवण्याकरिता गावोगावी भटकंती करून तथा मुलांना खाजगी वाहन किरायाने करुन नेण्याची व्यवस्था स्वत: शिक्षकांना करावी लागत आहे.शाळेच्या हितासाठी जेवढे प्रयत्न करता आले तेवढे केले. मात्र संस्थेच्या वादात शाळेचा विकास झाला नाही. उलट मला निवृत्तीची केस सादर करावी लागली.- नंदा सोनकुसरे,मुख्याध्यापिका, चंदनखेडा.

टॅग्स :Schoolशाळा