टिप्परच्या धडकेत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:03 IST2019-05-10T00:02:47+5:302019-05-10T00:03:06+5:30

भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. ही घटना गांगलवाडीजवळील विकासनगरजवळ गुरुवारी सकाळी घडली. रोहिणी घनश्याम लुटे (४५) रा. कोसंबी (गवळी) ता. नागभीड असे मृतक महिलेचे नाव असून त्या आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या.

The death of a woman in tiptoe | टिप्परच्या धडकेत महिलेचा मृत्यू

टिप्परच्या धडकेत महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. ही घटना गांगलवाडीजवळील विकासनगरजवळ गुरुवारी सकाळी घडली. रोहिणी घनश्याम लुटे (४५) रा. कोसंबी (गवळी) ता. नागभीड असे मृतक महिलेचे नाव असून त्या आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या. रोहिणी लुटे या आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास आपली मुलगी मुलगी माधवी लुटे हिच्यासोबत आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे दुचाकीने लग्नाला जात होत्या. विकासनगरजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या रोहिणी या उसळून खाली पडल्या. त्याचक्षणी टिप्परचा चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने घटनास्थळीच जागीच त्यांचा मृत्यू झाला. ता मुलगी माधवी थोडक्यात बचावली.

Web Title: The death of a woman in tiptoe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात