शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात गडचिरोलीतील पोलीस निरीक्षक सचिन माळी यांच्या पत्नीसह दोघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:38 IST

भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले.

 चंद्रपूर : भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना मूल-चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट येथे मंगळवारी दुपारी ३.३० वाजतादरम्यान घडली. आकांक्षा सचिन माळी (२८), पवन नन्नावरे (२८) अशी मृतकांची नावे आहेत. अंश सचिन माळी (२), सागर सूर्यकांत शिंदे (२८), नितीन वाढई (२५) अशी जखमींची नावे असून मृत व जखमी हे सोलापूर येथील रहिवासी आहेत.आकांक्षा माळी या गडचिरोली येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत पती सचिन माळी यांना भेटण्याकरिता मुलगा अंश व भावासह एमएच १३ सीएस ३९११ क्रमांकाच्या कारने जात होत्या. चंद्रपूरहून मूलमार्गे जाताना मूलच्या अलीकडे असलेल्या केसलाघाट परिसरात कार चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. या भीषण अपघातात कारमधील पाचही जण गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती होताच परिसरातील लोकांनी धाव घेतली. लगेच रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र आकांक्षा माळी व पवन नन्नावरे यांची वाटेतच प्राणज्योत मालवली. अन्य तीन जखमींवर उपचार सुरू आहे. या घटनेची नोंद मूल पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र