शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराअभावी इसमाचा मृत्यू

By admin | Updated: December 17, 2015 00:41 IST

नवीन बसस्थानकासमोर हुळहुळणाऱ्या अनोळखी व्यक्तीला माजी नगरसेवकाने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हरविली संवेदना : उपजिल्हा रूग्णालयातील प्रकारतुमसर : नवीन बसस्थानकासमोर हुळहुळणाऱ्या अनोळखी व्यक्तीला माजी नगरसेवकाने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तासभरानंतरही उपचार न केल्याने अखेर या इसमाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात घडली. गत दोन ते तीन दिवसांपासून पारा घसरला असून थंडी वाढली आहे. परराज्यातून आलेला हा मनोरुग्ण अंदाजे ४५ ते ५० वर्ष वयोगटातील आहे. हा इसम तुमसर येथील नवीन बसस्थानकावर एक दिवसापूर्वी फिरत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. इकडे तिकडे भीक्षा मागून त्याने पोटाची आग शमविली. परंतु थंडीपासून बचाव करण्याकरिता त्याचेकडे कोणतेही साधन नसल्याने त्या इसमाने अंगावर घातलेला शर्टालाच पांघरून म्हणून ओढले. परंतु कडाक्याच्या थंडीने त्याला झोपू दिले नाही. सकाळ होताच तो इसम कोवळ्या उन्हात येवून झोपला. त्याची प्रकृती खालावली होती. काही संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वप्रथम माजी नगरसेवक बाळा ठाकूर यांना माहिती दिली. त्यांनी त्या इसमाला उठवून त्याला चहा नाश्ता दिला. परंतु त्याची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून रूग्णवाहिका मागविली. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्या इसमाला रुग्णालयात उपचारासाठी नेले. कर्तव्यावर असलेले डॉक्टरांना त्या इसमाची हकीकत सांगून लवकर उपचार करण्याची विनंती केली. परंतु संवेदना संपलेल्या डॉक्टरांनी कोणतेही प्रतिक्रया न दाखविताना वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उपचाराला विलंब झाल्याने त्या अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी)