ताडोबा बफर क्षेत्रात दिवसभर व्याघ्र सफारीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 20:02 IST2022-11-14T20:01:49+5:302022-11-14T20:02:32+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारपासून प्रायोगिक तत्त्वावर दिवसभर पर्यटन सफारीला सुरुवात झाली आहे.

ताडोबा बफर क्षेत्रात दिवसभर व्याघ्र सफारीचा शुभारंभ
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारपासून प्रायोगिक तत्त्वावर दिवसभर पर्यटन सफारीला सुरुवात झाली आहे. या जिप्सीत केवळ चार पर्यटक असतील. बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या उपस्थितीत सफारीचा शुभारंभ करण्यात आला.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर झोनपाठोपाठ बफर झोनमध्ये दिवसभर सफारीला सुरुवात करण्यात आली. दिवसभर सफारी सुरू करू नये, अशी मागणी जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी व पर्यावरणवाद्यांनी केली होती. परंतु साेमवारी मोहर्ली बफर झोन अंतर्गत देवाडा-आगरझरी, जुनोना-अडेगाव या मार्गाने दिवसभर सफारीचा शुभारंभ झाला. ताडोबा कोअर झोनमध्ये एका दिवसाला तीन जिप्सी दिवसभरासाठी सोडण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या सफारीचे दिवसभराचे शुल्क ४५ हजार रुपये आहे.