निमणी पाणीपुरवठा योजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 01:14 IST2017-05-20T01:14:12+5:302017-05-20T01:14:12+5:30

कोरपना तालुक्यातील निमणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे. त्यामुळे १४ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

Dakshin Water Supply Scheme | निमणी पाणीपुरवठा योजना सुरू

निमणी पाणीपुरवठा योजना सुरू

१४ गावांचा मिटला : थकित वीज बिलामुळे पुरवठा होता खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
बाखर्डी : कोरपना तालुक्यातील निमणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे. त्यामुळे १४ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. एक लाख रुपयांच्या थकबाकीमुळे ही योजना आठ दिवसांपासून बंद होती.
‘लोकमत’ने निमणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वृत्त प्रकाशित केले आहे. त्याची दखल घेत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने महावितरण कंपनीच्या थकीत वीज देयकांच्या एक लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर ही योजना शुक्रवारपासून सुरू करण्यात आलीे. निमणीतील ग्रामस्थांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत होते. महावितरणने या प्रादेशिक योजनेची थकबाकी वसूल करण्यासाठी १० मेपासून वीजपुरवठा खंडित केला होता.
कोरपना तालुक्यातील भोयगाव जीघी वर्धा नदीवर निमणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा राबविली जाते. पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर उन्हाळ्यात नागरिकांना भेडसवणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे अत्यंत गरजेचे होते. ही पाणीपुरवठा योजना सुव्यवस्थित सुरू राहण्या साठी प्रादेशिक पाणीपुरवठा समितीला थकबाकी भरण्यासाठी मासिक हप्ते करुन दिले आहेत. भविष्यात ही योजना बंद होऊ नये,यासाठी नागरिकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे.

Web Title: Dakshin Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.