महाकृषी ऊर्जा धोरण अभियांनांतर्गत चंद्रपुरात सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:17+5:302021-02-05T07:41:17+5:30

चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी सायकल चालवित सदर रॅलीचे नेतृत्व केले. अंचलेश्वर गेट, गिरनार चैक, ...

Cycle Rally at Chandrapur under Mahakrishi Energy Policy Campaign | महाकृषी ऊर्जा धोरण अभियांनांतर्गत चंद्रपुरात सायकल रॅली

महाकृषी ऊर्जा धोरण अभियांनांतर्गत चंद्रपुरात सायकल रॅली

चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी सायकल चालवित सदर रॅलीचे नेतृत्व केले. अंचलेश्वर गेट, गिरनार चैक, गांधी चैक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चैक, वाहतूक कार्यालय मार्गे महावितरणच्या ऊर्जानगर उपकेंद्रात सांगता झाली.

रॅलीत महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकल चालवित सहभाग नोंदविला. सदर रॅलीत चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता(पायाभूत आराखडा) सुहास म्हेत्रे, सहा.महाव्यवस्थापक (चंद्रपूर परिमंडळ) सुशील विखार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी योगेश गोरे, कार्यकारी अभियंता(चंद्रपूर विभाग) विजय चावरे, कार्यकारी अभियंता (बल्लारशा विभाग) महेश तेलंग, महावितरण कर्मचारी कला व क्रीडा मंडळ चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी महावितरण कर्मचारी कला व क्रीडा मंडळ चंद्रपूरचे पदाधिकारी अमित बिरमवार, बंडू कुरेकार आदींनी सहकार्य केले.

Web Title: Cycle Rally at Chandrapur under Mahakrishi Energy Policy Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.