शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

भिमलकुंड पसिरात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 6:00 AM

या मार्गावर असलेली हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहीत करीत आहेत. सभोवताल हिरवे रान त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा विलोभनीय आहे. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भूरळ घालत आहे.

ठळक मुद्देनिसर्गरम्य स्थळ : यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटकांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना तालुक्यातील ‘सावलहिरा’ गावापासून चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा ‘भिमलकुंड’ धबधबा आहे. हा धबधबा आता ओसंडून वाहू लागला असून पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये परिसर गर्दीने फुलला असून चंद्रपूरसह यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटक येथे येत आहेत. या पर्यटन स्थळाचा विकास करून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. डोंगररांगातील हिरव्याकंच वनराईतून पायदळ वारी करत स्थळ गाठावे लागते. डोंगरदऱ्यांमुळे येथे एखादा व्यक्ती रस्ता सोडून भटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर असलेली हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहीत करीत आहेत. सभोवताल हिरवे रान त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा विलोभनीय आहे. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भूरळ घालत आहे. येथील रानफुल सुगंधाची मुक्त हस्ताने उधळण करीत असतात. निसर्गाच्या या शावरखाली आंघोळ करण्याची मजा घेण्यासाठी पर्यटक येथे हजेरी लावत आहे.सुमारे १५० फुट उंच कडावरून कोसळणाऱ्या पाण्यांमुळे खाली जमिनीवर कुंड तयार झाला. या कुंडाला ‘भिमलकुंड’ म्हणून संबोधले जाते. या कुंडाचे रूप हे भीमासारखे भासत असल्यानेच याचे नाव ‘भिमलकुंड’ पडल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र येथील कडा उतरणे व चढणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच या धबधब्याचा पर्यटनाचा दृष्टीने विकास करणे महत्त्वाचे आहे.या डोंगरावर विविध वनऔषधी वनस्पती आहे. येथील रस्त्याच्या कडेला आवळ्याच्या रांगा आहे. या धबधब्यालगतच्या परिसरात भस्म नागाची खोरी, रोहिणीमुंडा, जांभूळधराची झिरणे, बोदबोधी आदी पर्यटनस्थळेही असून येथेही पर्यटक जात असून निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.लालपहाडीपर्यंतच आहे रस्ताभिमलकुंड धबधबा येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहे. पहिला सावलहिरा आणि दुसरा टांगाळा. यातील सावलहिरावरून जाताना येल्लापूर रस्त्यावर पहाड आहे. तिथून गोल घुमटांच्या दिशेने रस्त्यावरच दुचाकी ठेऊन पायदळ वारी करीत डोंगरमाथातून स्थळापर्यंत पोहचता येते. टांगाळा येथून नाल्या-नाल्याने सरळ दिशेने वर चढत जावे लागते. दोन्ही मार्गाने वाहनांने जाता येत नाही. ही वाहने लाल पहाडी किंवा टांगाळा येथेच ठेऊन पायदळ मार्गक्रमण करावे लागते.विकासाअभावी पर्यटकांची गैरसोयमाणिकगड पहाडालगत असलेल्या कोरपना व जिवती तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहे. मात्र ती उपेक्षित असून शासन दरबारी नोंदसुद्धा नाही. या स्थळांवर लक्ष केंद्रीत करून विकास करावा अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. चौपाटी गुफा, काराई गोराई, कपिलाई भुयार, बानकदेवी आदी स्थळांचा विकास केल्यास पर्यटकांना दिलासा मिळेल.

टॅग्स :tourismपर्यटन