शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध विकास विभागाच्या गाय खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By admin | Updated: December 18, 2014 00:48 IST

दुग्ध विकास विभागाच्या नागपूर विभागात १२ प्रोजेक्ट कार्यरत असून प्रत्येक प्रोजेक्टरवर ४६ लाख रुपये खर्च करण्यात आला.

बी.यू. बोर्डेवार राजुरादुग्ध विकास विभागाच्या नागपूर विभागात १२ प्रोजेक्ट कार्यरत असून प्रत्येक प्रोजेक्टरवर ४६ लाख रुपये खर्च करण्यात आला. मात्र या प्रोजेक्टपैकी अनेक प्रोजेक्टमध्ये गाईच नाही. याशिवाय अनेक ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे निदर्शनास येत आहे.नागपूर विभागातील एका दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने पुणे येथील कंपनीला एका वस्तुच्या खरेदीसाठी दोन वेळा धनादेश दिला आहे. श्रीकृष्ण दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेस पुरवठा केलेल्या एक हजार लिटर क्षमतेच्या बल्क कुलरसाठीे चार लाख १२ हजार ८०० एवढया रकमेची ज्यादा उचल करण्यात आलेली असल्याचे पत्र पुणे येथील कंपनीला जिल्हा दुग्धशळा विकास अधिकारी यांनी अनेक वेळा पाठविले.दोन वेळा एकाच वस्तुसाठी पाठविलेल्या धनादेशाचा क्रमांक ९७०९११ आणि ९७०९४० असा आहे. प्रत्येक वेळा चार लाख १२ हजार ८०० चा धनादेश देण्यात आला आहे. राज्यामध्ये दुग्ध विकास होऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा, यासाठी राज्य शासनाने नागपूर विभागात १२ प्रोजेक्ट तयार केले. प्रत्येक प्रोजेक्टवर ४६ लाख रुपये खर्च केला. परंतु अनेक ठिकाणी प्रोजेक्टरची अवस्था वाईट असल्याच्या तक्रारी आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेने अंतर्गत नागपूर विभागातील दुग्ध प्रकल्पाची फेर तपासणी करण्याची गरज आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची माहिती आहे.