शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे पीक कर्ज फेडण्याचे संकट

By admin | Updated: April 8, 2016 00:57 IST

गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून गेलेला आहे. शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली.

भं. तळोधी : गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून गेलेला आहे. शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली. पिकाला भावी आर्थिक कमजोरीमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी पूर्णत: संपलेला आहे. गेल्या काही वर्षापासून शेतकरी मदतीची आशा करीत आहे. शेतकऱ्यांपुढे मागील पीक कर्ज कसे फेडणार, या चिंतेने ग्रासला आहे. मात्र आर्थिक मदत किंवा पिकविमा रक्कम त्यांच्या पदरात अजूनही पडली नाही. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सत्ता प्राप्तीपूर्वी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन आघाडी सरकारने दिले. मात्र पूर्तता करण्यास ते विसरले, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शेती गाठ्याची असल्यामुळे येथील शेतकरी तूर, धान, कापूस, हरभरा, सूर्यफूल इत्यादी पिके घेत असतो. दरवर्षी शेतकरी बँकाकडून पीक कर्ज घेतात. शेतामध्ये काहीच उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकरी पीक विमा उचलतात. पिक विमा उचलताना बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना विविध आशा दाखवितात. मात्र, पिक विम्याची भरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकरी करीत आहे. गेल्या दोन वर्षापासून गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा दुष्काळ, कधी अल्पवृष्टी होऊन नापिकीचा सामना कारावा लागत आहे. गेल्या तीन- चार वर्षापासून शेतकऱ्यांनी पीक कर्ज थकीत ठेवलेले आहे. या वर्षीसुद्धा दुष्काळाची परिस्थिती फार गंभीर आहे. यातच आर्थिक मदत, पिक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)