शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेची तपासणी

By admin | Updated: October 14, 2014 23:16 IST

येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे दिवाळीकरिता बाजारात उपलब्ध असणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेची तपासणी गुरुवारी तुकूम पोलीस मैदान येथे करण्यात आली.

चंद्रपूर : येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे दिवाळीकरिता बाजारात उपलब्ध असणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेची तपासणी गुरुवारी तुकूम पोलीस मैदान येथे करण्यात आली. दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण तसेच वायू प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. याबाबत केंद्र शासनातर्फे प्रत्येक प्रकारच्या फटाक्यांसाठी आवाजाच्या तीव्रतेची विहीत मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे फटाके फोडल्यानंतर होणारा आवाज हा विहित मर्यादेत आहे अथवा नाही, याबाबत प्रत्यक्ष फटाके फोडून आवाजाच्या तीव्रतेची तपासणी यावेळी करण्यात आली. तपासणीदरम्यान एकेरी फटाक्यांचा आवाज हा विहीत मर्यादेत असल्याचे आढळून आले. परंतु पाच हजार फटाक्यांच्या माळेचा आवाज हा विहीत मर्यादेत नसल्याचे आढळून आले. तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अ. ना. हर्षवर्धन, उपप्रादेशिक अधिकारी सं. दे. पाटील, क्षेत्र अधिकारी की. प्र. पुसदकर, डॉ. प्रभाकर वावडे, राखीव पोलीस निरीक्षक चौधरी तसेच इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे व ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा. सुरेश चोपणे उपस्थित होते. दिवाळी सणाला फटाक्यांचा वापर कमीत कमी करण्याचे तसेच मोठ्या आवाजाचे फटाके व फटाक्यांच्या माळा न वापरणे, फटाके फोडताना काळजी घ्यावी, असे आवाहन याप्रसंगी प्रादेशिक अधिकारी डॉ. हर्षवर्धन यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)