भूमिअधिग्रहण कायद्याविरोधात भाकपचा रास्तारोको
By Admin | Updated: May 15, 2015 01:16 IST2015-05-15T01:09:54+5:302015-05-15T01:16:05+5:30
प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायदा पारित करण्यात येऊ नये, मागणीसाठी गुरूवारी दुपारी १ वाजता

भूमिअधिग्रहण कायद्याविरोधात भाकपचा रास्तारोको
चंद्रपूर: प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायदा पारित करण्यात येऊ नये, मागणीसाठी गुरूवारी दुपारी १ वाजता येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व नामदेव कन्नाके, संतोष दास, रमेश तावाडे, प्रकाश रेड्डी, विश्वनाथ बुरांडे, डॉ. गंगारेड्डीवार यांनी केले .
भाकपच्यावतीने गुरूवारी भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करण्यासाठी देशभर आंदोलन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातही रास्ता रोको आंदोलन पार पडले. या रास्ता रोको आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना भूमी अधिग्रहण बील परत घेण्याची मागणी करणारे निवेदन पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)