नागभीड-नागपूर नॅरोगेज रेल्वेचे काऊंटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:42+5:30

घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या नॅरोगेज रेल्वेगाडीचे काऊंटडाऊन सुरू ...

Countdown of Nagbhid-Nagpur Narrows gauge started | नागभीड-नागपूर नॅरोगेज रेल्वेचे काऊंटडाऊन सुरू

नागभीड-नागपूर नॅरोगेज रेल्वेचे काऊंटडाऊन सुरू

ठळक मुद्देसंडे अँकर । २५ नोव्हेंबरपासून गाडीची चाके कायमची थांबणार

घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या नॅरोगेज रेल्वेगाडीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २५ नोव्हेंबरपासून या गाडीची चाके कायमची थांबणार आहे.
भविष्यात या रेल्वेने प्रवासाची संधी मिळणार नाही. म्हणूनच शेवटचा प्रवास म्हणून अनेकांनी नागपूर आणि जवळच्या मांगली, कानपा, भुयार, भिवापूर, उमरेड अशा ठिकाणी प्रवास करणे सुरू केले आहे. १९१३ पासून या मार्गावर ही नॅरोगेज रेल्वे अव्याहत धावत आहे. पण काळाच्या ओघात या रेल्वे गाडीची उपयोगिता कमी होऊ लागली. आणि प्रथमत: १९५२ मध्ये या मार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी संसदेत करण्यात आली. त्यानंतर १९८२ - ८३ मध्ये या मागणीचा संसदेत पुन्हा पुनरूच्चार झाला. पण पुरेशा पाठपुराव्याअभावी ही मागणी तशीच पडून राहिली. मात्र १९९३ च्या दरम्यान खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या रेटयामुळे गोंदिया - बल्लारशा या नॅरोगेज रेल्वे मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली व ते कामही पूर्ण करण्यात आले.
दरम्यान २००० च्या दशकात या नॅरोगेज मार्गाने पर्यटन गाडीचा बागुलबुवा उभा करण्यात आल्याने शासकीय तसेच प्रशासकीय स्तरावर ब्रॉडगेजची मागणी मागे पडली. मात्र सामान्य जनतेतून या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रूपांतर करण्यात यावे, ही मागणी नेहमीच करण्यात येत होती. अखेर शासनाने या रेल्वे मार्गास मंजुरी प्रदान केली आहे.
एवढेच नाही तर १ डिसेंबरपासून कामास सुरूवातही करण्यात येणार आहे. याअनुषंगाने रेल्वेच्या मंडल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांनी नागपूरवरुन या मार्गाने प्रवास करून अडचणी समजून घेतल्या.

दिवसभरात चार टाईमिंग
या मार्गाने दिवसभरात चार टाईमिंग होते. यात सकाळी ६.१० , ८.२५ , दुपारी १२ च्या दरम्यान तर संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान असे चार टाईमिंग नागभीडवरून नागपूरला रवाना होत होते. नागपूरचे भाडे २५ रुपये असल्याने सर्वसामान्य प्रवासी या गाडीलाच पसंती देत होते.

महाप्रबंधकांचाही 'प्रवास'
शुक्रवारी झोन रेल्वे महाप्रबंधक गौतम बॅनर्जी व मंडल रेल्वे प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांनी या नॅरोगेज रेल्वे गाडीने प्रवास केला व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वरिष्ठ सहायक मंडल अभियंता ए.टी.पांडे, स्टेशन प्रबंधक मसराम, रेल्वे झोन कमिटीचे सल्लागार सदस्य संजय गजपुरे, नागभीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ.उमाजी हिरे यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी महाप्रबंधकांनी नागभीड रेल्वे स्टेशन व परिसराची पाहणी केली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवरील विविध समस्या जाणून घेत त्यांना सोडविण्यासाठी आश्वासन दिले.

Web Title: Countdown of Nagbhid-Nagpur Narrows gauge started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे