कोतवाल पक्षी करतो मांजरीची मिमिक्री

By Admin | Updated: August 7, 2014 23:52 IST2014-08-07T23:52:38+5:302014-08-07T23:52:38+5:30

देशात कलावंतांची काही कमी नाही. आपण आजवर मिमीक्री करणारे अनेक आर्टीस्ट बघितले आहेत. मात्र चक्क पक्षीही मिमिक्री करू शकतो, हे ऐकून नवल वाटेल. मात्र हे खरे आहे. कोतवाल नामक

Cotawar Birds Kittens Mimicry | कोतवाल पक्षी करतो मांजरीची मिमिक्री

कोतवाल पक्षी करतो मांजरीची मिमिक्री

चंद्रपूर : देशात कलावंतांची काही कमी नाही. आपण आजवर मिमीक्री करणारे अनेक आर्टीस्ट बघितले आहेत. मात्र चक्क पक्षीही मिमिक्री करू शकतो, हे ऐकून नवल वाटेल. मात्र हे खरे आहे. कोतवाल नामक पक्षी मांजरीची मिमिक्री करतो, हे पक्षीमित्र्यांच्या अध्ययनावरून स्पष्ट झाले आहे. शिवाय हा पक्षी पोपट, कावळा, मैनासारख्या इतर पक्ष्यांचाही हुबेहुब आवाज काढतो.
अंधारी वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे अध्यक्ष व पक्षीमित्र प्रकाश कामडे यांनी कोतवाल या पक्ष्याच्या हालचालीचा बारकाईने अभ्यास केला. यावेळी हा पक्षी मांजर दिसताच मांजरीचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने मांजरासारखा आवाज काढतो. मांजर त्याच्या आवाजाला अनेकदा प्रतिसादसुध्दा देते. ती बाहेर आली की तिच्यावर झडप घालून तिला पळवूनही लावते. कोतवालाचा हा खेळ कामडे यांनी अनेकदा अनुभवला आहे. कोतवाल पक्ष्याला इंग्रजीत ब्लॅक ड्रोगो तर हिंदीत भुजंगा असे नाव आहे. अगदी छोट्या आकाराचा हा चपळ व किडकिडीत अंगाचा पक्षी काळ्या रंगाचा असतो. शेपटी खोलवर दुभागलेली असते. हा पक्षी विदर्भात सर्वत्र आढळतो. ग्रामीण भागात तर याचे वास्तव्य हमखास असते. भारताशिवाय हा पक्षी बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका व म्यानमार येथेही आढळतो. किडे, फुलांचे पराग, कधी कधी लहान पक्षी हे या कोतवलाचे खाद्य आहे. हा पक्ष्याचे ग्रामीण भागाशी खास नाते आहे. विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारावर हा पक्षी नेहमी ऐटीत बसलेला दिसतो. कुरणात जनावरे चरताना उडलेले किडे दिवसभर टिपतो. जंगलात आग लागल्यास तिथे कळपाने उपस्थित राहून किडे खातानाही हे पक्षी दिसतात.
मिमिक्रीच्या माध्यमातून इतरांसोबत खेळणाऱ्या या पक्ष्याला कधी रागही येतो. रागाने कर्कश व आव्हान देणारा आवाज काढतो. कावळा, घार, शिका, कोकीळ व आपल्यापेक्षा मोठ्या पक्ष्यांना हाकलून लावण्यासाठी व आपल्या खाद्यापासून आणि घरट्यापासून दूर ठेवण्यासाठी तो आपल्यातील या कलाबाजीचा पुरेपूर वापर करताना दिसतो, अशी माहितीही पक्षीमित्र प्रकाश कामडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Cotawar Birds Kittens Mimicry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.