शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना ग्रामपंचायतमध्ये साडेचार लाखांचा भ्रष्टाचार

By admin | Updated: November 10, 2014 22:40 IST

येथील ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ४ लाख ६९ हजार रुपयाचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबत विस्तार अधिकाऱ्यांच्या समितीने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. झालेल्या गैरव्यवहाराची

लखमापूर : येथील ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ४ लाख ६९ हजार रुपयाचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबत विस्तार अधिकाऱ्यांच्या समितीने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.मागासक्षेत्र विकास निधी योजनेतील पत्रकात बोगस मजुरांचे हजेरी पटावर नाव नोंदणी करून आर्थिक व्यवहार केला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर १३ वा वित्त आयोगांंतर्गत नमुना २२ मधील पान ८ मध्ये जुलै २०१४ च्या हजेरीपटात आपल्याच कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचे नाव नोंदवून २१ हजार ६५० रुपयाची अफरातफर केली आहे. यामध्ये बोगस स्वाक्षऱ्या करून पैशाची उचल करण्यात आल्याचे समजते. याबाबत विस्तार अधिकारी बी.बी. उराडे यांच्या पथकाने चौकशी केली असता, सदर प्रकार उघडकीस आला. तालुक्यात शतकोटी वृक्षलागवड व पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेंचा सर्वत्र बोजवारा वाजला आहे. या योजनेंतर्गत कोरपना ग्रामपंचायतीमध्ये शासकीय मान्यता न घेता रकमेचा अपहार केला आहे. योजनेच्या निकषानुसार कोणतीही मंजुरी न घेता २ लाख ७७ रुपये खर्ची घालण्यात आले आहे. यामध्ये ट्री गार्ड, कचरा कुंडी, सीएफएल बल्ब खरेदी केल्याचे दाखविण्यात आले. मात्र गावात कचरा कुंड्याच दिसत नसून कचरा कुंड्या कुठे बांधण्यात आल्या, त्याला प्रशासकीय मान्यता केव्हा मिळावी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यात गैरव्यवहार झाल्याचा सुर नागरिकांमध्ये आहे. सौरदिवे खरेदी करताना निविदा न काढताच २ लाख ७७ हजार ५०० रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. सामान्य फंडनिधीतून कोणत्याही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात अ‍ॅडव्हान्स रक्कम न देण्याचे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र सदर ग्रामसेवकाने ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन करीत रवींद्र माजरे व शंकर मालेकर यांना ४८ हजार रुपयाचे वाटप केले आहे. सोबतच गावातील नाल्याचा मलबा काढण्यासाठीच्या कामावर कोणताही मलबा न काढता त्यासाठी १ लाख १८ हजार ७५ रुपयाचा खर्च दाखवून गैरव्यवहार केल्याचे चौकशीमध्ये आढळले आहे.मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायतीचा खर्च व वार्षिक आराखडा केल्याशिवाय खर्च करता येत नाही. ही बाब नुकतीच विस्तार अधिकाऱ्यांनी तपासली असता यामध्ये ४ लाख ६९ हजार ५०० रुपये कोरपना येथील ग्रामसेवक व सरपंचाच्या संयुक्त स्वाक्षरीने खर्च केल्याचे चौकशीत म्हटले आहे. सदर रक्कम सरपंच व सचिव यांच्यावर वसुली पात्र असून या चौकशीचा अहवाल कोरपना येथील संवर्र्ग विकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)