शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

लाचखोर गृहनिर्माण अभियंता एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:34 AM

घोडाअर्जुनी येथील तक्रारदाराचे वडील व आजाेबाच्या नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूलसाठी प्रत्येकी एक लाख ४८ हजार याप्रमाणे २ ...

घोडाअर्जुनी येथील तक्रारदाराचे वडील व आजाेबाच्या नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूलसाठी प्रत्येकी एक लाख ४८ हजार याप्रमाणे २ लाख ९६ हजार रुपये मंजूर झाले होते. घराच्या बांधकामाचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्याने बांधकामाचे एकूण ९० हजार मिळावे, यासाठी त्यांनी पंचायत समिती जिवती येथे देयक सादर केले. अभियंता शिंदे याने हे बांधकाम पूर्ण झाले की नाही, याची पाहणी करण्यासाठी १४ सप्टेंबर २०२१ रोजी घोडाअर्जुनी येथे भेट घेतली. दरम्यान, बिल मंजुरीसाठी दोन्ही लाभार्थ्यांनी प्रत्येकी एक हजार याप्रमाणे दोन हजार रुपये देण्याची मागणी केली. पंचायत समितीत ही रक्कम आणून देण्याचेही त्याने बजावले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्यांनी अभियंता शिंदे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दोन हजार रुपयांची लाच घेताना शिंदे याला जिवती पंचायत समितीत अटक केली. पुढील तपास लाचलुचपत विभाग करीत आहे.