मनपाची पाच प्रतिष्ठानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST2021-05-12T04:29:24+5:302021-05-12T04:29:24+5:30

चंद्रपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठ सकाळी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश आहे. ...

Corporation's action on five establishments | मनपाची पाच प्रतिष्ठानांवर कारवाई

मनपाची पाच प्रतिष्ठानांवर कारवाई

चंद्रपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठ सकाळी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश आहे. असे असतानाही काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरू करून कोरोना नियमाचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या पाच प्रतिष्ठानांवर कारवाई करून १० हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. १ च्या सहायक आयुक्त शीतल वाकडे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, लिपिक फारुख अहेमद, विलास नांदणे तसेच अतिक्रमण पथक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईत शौकत अली, एरिस्टो सेल्स काॅर्पोरेशन, अमोल ट्रेडर्स, रवींद्र फर्निचर, जुनेद खान यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करून एकूण १० हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. यापुढेही नियमाचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.

Web Title: Corporation's action on five establishments