शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
2
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
3
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
4
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
5
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
6
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
7
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
8
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
9
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
10
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
11
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
12
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
13
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
14
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
15
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
16
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
17
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
18
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
19
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
20
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने घेतला स्वच्छ व सुंदरतेचा ध्यास

By admin | Updated: February 26, 2016 01:09 IST

भद्रावती शहर हे पर्यटननगरी घोषित झाली. त्यामुळे शहरात देश-विदेशातून लाखो नागरिक तथा भाविक येत असतात.

भद्रावतीकरांकडून सहकार्याची अपेक्षा : स्मार्ट सिटी करण्यासाठी धडपडआयुधनिर्माणी : भद्रावती शहर हे पर्यटननगरी घोषित झाली. त्यामुळे शहरात देश-विदेशातून लाखो नागरिक तथा भाविक येत असतात. आपले शहर या पाहुण्यांनी स्वच्छ व सुंदर शहर म्हणून अनुभवावे. एक स्मार्ट सिटी म्हणून भद्रावतीची ओळख जगाच्या नकाशावर निर्माण व्हावी, यासाठी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना स्वच्छ व सुंदर भद्रावतीचा ध्यास लागलेला आहे. त्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करुन सुंदर भद्रावतीच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.शहरातील नागरिकांना वीज, पाणी व रस्ते तथा भौगोलिक सुविधा पुरविणे हे नगरपालिकेचे काम आहे. पालिकेत राजकारणी मंडळी सत्ताधारी झाली की, आपली रुटीन कामे करीत असतात. भद्रावती पालिकाही याकामात कार्यरत आहे. परंतु या व्यतिरिक्त शहराच्या सुंदरतेचा ध्यास मनात बाळगून त्या दिशेने सक्रीय पाडले टाकणारे पालिका प्रशासन आपल्या आगळ्या-वेगळ्या कामाने शहरात कौतुकाचा विषय झालेले आहे.स्वच्छ भद्रावती ठेवण्यासाठी पालिकेने स्वत: पुढाकार घेऊन प्रत्येक कुटुंबाला दोन कचराकुंड्या विनामूल्य पुरविण्याचा संकल्प केलेला आहे. या कचराकुंड्या प्रत्येकी दहा लिटर क्षमतेच्या असून दोन रंगांच्या आहेत. हिरव्या रंगाच्या कचरा कुंडीत ओला कचरा व लाल रंगाच्या कचरा कुंडीत सुका म्हणजे वाळलेला कचरा जमा करावयाचा आहे. सदर कचराकुंडीचे वाटप पालिकेतर्फे सुरू होणार असून मालमत्ताधारकांनी चालू वर्षाचा कर भरल्याची पावती दाखवून या कचराकुंडीला नि:शुल्क घरी नेता येणार आहे. आता पालिका प्रशासनानेच कचराकुंड्या वितरित केल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याने रस्त्यावर पडणारा कचरा कुंडीतच पडल्याने शहरातील सार्वत्रिक घाण कमी होण्यास मदत होणार आहे.१ फेब्रुवारीपासून भद्रावती शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. अशा प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वा कागदी पिशव्यांचा पर्याय पालिकेने पुढे आणला आहे. या उपरांत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा विक्रीसाठी वापर होत असल्याचे लक्षात येताच, १५ दुकानदारांवर कारवाई करुन ५० किलो पिशव्या पालिकेने जप्त केल्या आहे. पालिका शहराच्या सुंदरतेकरिता प्लास्टिक निर्मूलनावर विशेष भर देणार आहे. तसा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही मंजूर करुन घेतला आहे. प्लास्टिक पिशव्या वापर करणाऱ्यांवर पालिकेची वक्रदृष्टी असल्याचे शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापर कमी होईल. परिणामत: इकडेतिकडे फेकल्यानंतर दिसणारे ओंगळवाणे प्लास्टिक दर्शन कमी होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असा नागरिकांना विश्वास आहे. नगराध्यक्ष अनिल धानोरकर स्वत: शहराची सुंदरता गांभीर्याने घेऊन विविध सामाजिक संथा व कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून असल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास भद्रावती शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नावारुपास येईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.(वार्ताहर)