coronavirus : चिंताजनक ! चंद्रपूरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला; २३ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 14:24 IST2020-05-13T14:23:19+5:302020-05-13T14:24:01+5:30
पॉझिटिव्ह मुलगी, तिचा भाऊ व आई हे यवतमाळ येथून परतले आहेत

coronavirus : चिंताजनक ! चंद्रपूरमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला; २३ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह
चंद्रपूर : चंद्रपुरात कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. 23 वर्षाच्या मुलीचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह. ही मुलगी 9 मे रोजी यवतमाळ येथून आली. तिचे 11 मे रोजी घशातील स्त्राव नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्ण मुलीची आई यवतमाळ येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. दीड महिन्यापासून ती, तिचा भाऊ हे यवतमाळ येथे होते. हे तिघेही एका कारने चंद्रपुरात आले, त्यानंतर चालक कार घेवून परत गेला. अन्य दोघांचे स्त्राव घेतले जाणार आहेत.
यापूर्वी कृष्णनगर येथील चौकीदार असलेला इसम पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्या संपर्कात आलेले एकही जण पॉझिटिव्ह आला नाही. अशातच दुसरा रुग्ण आढळला असून तो जनता कॉलेज परिसरातील आहे.