शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Chandrapur; ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे ज्येष्ठ नागरिक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 09:35 IST

Coronavirus in Chandrapur vaccination शासनाने कोविड प्रतिबंध लस जवळपासच्या कोणत्याही केंद्रावर घेण्याची मुभा दिल्याने चंद्रपूर-बल्लारपूर शहरातील नागरिक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून विसापूर केंद्राची निवड करीत असल्याने स्थानिक नागरिकांना व ज्येष्ठांना लस घेणे अडचणीचे झाले आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांना कोविड लस घेणे अडचणीचे

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : शासनाने कोविड प्रतिबंध लस जवळपासच्या कोणत्याही केंद्रावर घेण्याची मुभा दिल्याने चंद्रपूर-बल्लारपूर शहरातील नागरिक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून विसापूर केंद्राची निवड करीत असल्याने स्थानिक नागरिकांना व ज्येष्ठांना लस घेणे अडचणीचे झाले आहे.

मागील दोन महिन्यांपासून विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविड प्रतिबंध लसीकरण करण्यात येत आहे. त्यापैकी बरेच नागरिक दुसरा डोज घेण्यासाठी केंद्रावर येत आहेत; परंतु बल्लारपूर व चंद्रपूरचे नागरिक येथे लस घेण्यासाठी येत असल्यामुळे स्थानिक विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना लस घेणे आता अडचणीचे झाले आहे. कारण ते लसीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना विसापूर केंद्राची निवड करीत असल्याने त्यांच्या नावाने लस आरक्षित झाल्याने प्रथम त्यांना देण्यात येत आहे व उर्वरित लस स्थानिकांना देण्यात येत असल्यामुळे यामध्ये असंख्य ज्येष्ठ नागरिकांना अँड्रॉइड मोबाइल हाताळता येत नसल्यामुळे लोकेशन ट्रेस करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे

केंद्रावरून त्यांना परत जावे लागत आहे. या कारणाने त्यांच्यात कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. पूर्वी केंद्रावर त्यांच्या नावाचे रजिस्ट्रेशन करून दिले जात होते; परंतु आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लस कशी घ्यावी, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.

शासनाने स्थानिक पातळीवर याबाबत उपाययोजना करून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस