Coronavirus in Chandrapur; चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आलेख घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 22:06 IST2021-05-03T22:05:00+5:302021-05-03T22:06:01+5:30
Chandrapur news चंद्रपूर जिल्ह्यात मागील २४ तासात ९९४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ९७३ बाधितांची नव्याने भर पडली तर २२ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus in Chandrapur; चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आलेख घसरला
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ९९४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ९७३ बाधितांची नव्याने भर पडली तर २२ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६३ हजार ८६८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या ४६ हजार १२५ झाली आहे. सध्या १६ हजार ७६७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ८७ हजार २३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख १८ हजार ७९५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९७६ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ९०४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २९, यवतमाळ २८, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा व कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.