कोरोनाचा ग्राफ सातत्याने वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:08+5:302021-04-11T04:27:08+5:30
नागभीड तालुक्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे गेल्या पाच दिवसात पुढे आलेल्या रूग्णांवरून दिसून येत ...

कोरोनाचा ग्राफ सातत्याने वाढतोय
नागभीड तालुक्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे गेल्या पाच दिवसात पुढे आलेल्या रूग्णांवरून दिसून येत आहे. ५ एप्रिल रोजी १८ , ६ एप्रिलला २२, ७ एप्रिलला २६, ८ एप्रिल रोजी २७ तर ९ एप्रिलला ११ व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आला. या पाच दिवसात ७५९ व्यक्तींची कोरोनाची चाचणी करण्यात आली, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनोद मडावी यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनही तत्पर आहे. आरोग्य विभाग,तहसील प्रशासन, पंचायत समिती आणि नगरपरिषद यांच्यामार्फत विविध प्रयत्न सुरू आहेत. तहसीलदार चव्हाण यांनी नुकतीच नगरपरिषदेत सभा घेऊन नगरपरिषद परिसर तसेच तालुक्यातील गावागावात सॅनिटायझेशनवर विशेष भर देणे. सामाजिक तथा सार्वजनिक स्थळांवर मास्क वापरण्याचे कडक निर्बंध लावण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच,लसीकरणाची अंमलबजावणी गतीने व्हावी अशा सूचना दिल्या.