शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

कोरोनाचा पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 5:00 AM

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बल्लारपूर येथील ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मंगळवारी कोरोनामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. श्वसनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या बालाजी वार्ड, बल्लारपूर येथील या नागरिकाला २ ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. आल्यापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्यापैकी हा कोरोनामुळे झालेला पाचवा मृत्यू आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत जिल्ह्यात ८९८ बाधित : अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या झाली ३४८

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचीही संख्या वाढत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोरोनाने जिल्ह्यातील पाचवा बळी घेतला आहे. मंगळवारी जिल्ह्यात आणखी नव्या २६ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ८९८ झाली आहे.वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बल्लारपूर येथील ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मंगळवारी कोरोनामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. श्वसनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या बालाजी वार्ड, बल्लारपूर येथील या नागरिकाला २ ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. आल्यापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्यापैकी हा कोरोनामुळे झालेला पाचवा मृत्यू आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयातील पाच वगळता अन्य दोन मृतांमध्ये तेलगंणा राज्य व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा सहभाग आहे. आता पर्यत जिल्ह्यात ८९८ बाधिताची नोंद झाली आहे.कोरोनातून मुक्त होण्याची संख्याही वाढतेयमंगळवारी जिल्ह्यात आणखी नव्या २६ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ८९८ झाली आहे. विशेष म्हणजे दररोज जशी बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच कोरोनातून मुक्त झालेल्यांचीही संख्या वाढत आहे. मंगळवारपर्यंत तब्बल ५४३ कोरोनाबाधित आजारातून मुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ ३४८ आहे. यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.आणखी २६ बाधितांची भरमंगळवारी नवे २६ बाधित आढळून आले आहेत. यंमध्ये चंद्रपूर व लगतच्या परिसरातील ११ पॉझिटिव्हचा समावेश आहे. राजुरा व भद्रावती येथील प्रत्येकी दोन, बल्लारपूर येथील सहा, ब्रह्मपुरी येथील तीन तर मूल व चिमूर येथील प्रत्येकी एका पॉझिटिव्हचा समावेश आहे. राजुरा गडी वार्ड येथील पुरुष, विरूर येथील पुरुषा पॉझिटिव्ह ठरला आहे. चंद्रपूर येथील हवेली गार्डन परिसरातील महिला बाधित ठरली आहे. ही महिला नागपूर येथून प्रवास करून परत आलेली होती. नगीना बाग येथील अकोला येथून परत आलेला युवक बाधित आढळला आहे.जटपुरा वार्ड परिसरातील पुरुष बाधित ठरला आहे.त्या डॉक्टरमुळे संपर्कातील रुग्ण वाढलेघुग्घुस : येथील वार्ड क्र २ मधील एक खासगी डॉक्टर शनिवारी कोरोना बाधित आल्यानंतर मंगळवारी त्यांच्या संपर्कात आलेल्या पत्नी व वेकोलिच्या घुग्घुस येथील सुभाषनगर कामगार वसाहतीमधील एका कुटुंबातील आई व मुलगी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तो परिसर सील करण्यात आला आहे. आता घुग्घुस परिसरात शास्त्रीनगर, रामनगर, शालिकराम, नकोडा, एसीसी या ठिकाणी कोरोना रुग्ण मिळाले असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या