कोरोना संशयित रूग्णांच्या तपासणीला येणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:38+5:30
कोरोनाची चाचणी करण्याच्या दृष्टीने हे स्वॅब सेंटर उभारण्यासाठी रोटेरियन प्रेसिडेंट प्रदीप बुक्कावार यांनी स्व. अर्चना प्रदीप बुक्कावार तसेच रोटेरियन रमेश गोयल यांनी स्व. लोकेश रमेश गोयल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदत केली. याशिवाय माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनीही वाटा उचलला. याकरिता प्रकल्प संचालक राम चांदे व सचिन गांगारेड्डीवार यांनी मोलाची भूमिका बजावली. या प्रोजेक्टची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सचिन गांगरेड्डीवार यांच्याकडे केली होती.

कोरोना संशयित रूग्णांच्या तपासणीला येणार गती
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रोटरी क्लब चंद्रपूरतर्फे शुक्रवारी कोरोना स्वॅब तपासणी कक्षाचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. या कक्षामुळे तपासणीला वेग येणार आहे.
कोरोनाची चाचणी करण्याच्या दृष्टीने हे स्वॅब सेंटर उभारण्यासाठी रोटेरियन प्रेसिडेंट प्रदीप बुक्कावार यांनी स्व. अर्चना प्रदीप बुक्कावार तसेच रोटेरियन रमेश गोयल यांनी स्व. लोकेश रमेश गोयल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदत केली. याशिवाय माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनीही वाटा उचलला. याकरिता प्रकल्प संचालक राम चांदे व सचिन गांगारेड्डीवार यांनी मोलाची भूमिका बजावली. या प्रोजेक्टची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सचिन गांगरेड्डीवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर लगेच तीन दिवसांच्या आत सदर युनिट उपलब्ध झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी सर्वांचे कौतुक केले. युनिटचे स्ट्रक्चर अतिशय सुंदर व बघण्यासारखे आहे. हे युनिट वर्धा येथून तयार करण्यात आले. युनिट आणण्यासाठी वाहन व चालकाची जबाबदारी रोडमल गहलोत यांनी स्वीकारली होती. रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, अशी माहिती अध्यक्ष स्मिता ठाकरे व सचिव संदीप रामटेके यांनी दिली.
नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण
भद्रावती : शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी पूर्वनियोजन व खबरदारी म्हणून शनिवारी गौतम नगर परिसरात प्रशासनाकडून मॉकड्रिल करण्यात आला. शहरात सकाळपासूनच दुपारी २ वाजेपर्यंत हा परिसर सील ठेवला होता. नागरिकांचे सर्वेक्षण करून आरोग्याची माहिती जाणून घेण्यात आली. तहसील विभाग, पोलीस विभाग, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका विभाग, आशावर्कर व ईको-प्रो संस्था आदी या परिसरात तळ ठोकून होते. खोकला, सर्दी, शिंका, ताप, त्रास घेण्यास त्रास आदी लक्षणांची माहिती घेण्यात आली.
उपासमारीच्या भीतीने पायी प्रवास
तळोधी बा. : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथील मजूर काम करण्यासाठी राजुरा तालुक्यातील विरुर रेल्वे येथे गेले होते. मात्र,लॉकडावूनमुळे उपासमारीची वेळ येवू नये यासाठी त्यांनी पायदळ गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वे व बससेवा बंद असल्याने हे मजूर राजुरा तालुक्यातून तीन दिवसरात्र प्रवास करून गावाकडे पायदळ निघाले आहेत. हातात पाण्याची बॉटल घेऊन रेल्वे लाईन मार्गाने हे मजूर स्वगावी जात आहे.
पिंपळगावात हॉटेल सुरूच
पिंपळगाव (भो): ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) हॉटेल सुरूच असल्याने ग्राहकांची गर्दी असते. शाळेत क्वारंटाईन केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, समितीच्या उदासिनतेमुळे बाहेरूनआलेल्या व्यक्तींचे क्वारंटाईन केले जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.