चिखली येथे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:46+5:302021-04-23T04:30:46+5:30
मूल : तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र राजाेली उपकेंद्र चिखली यांच्या वतीने कोविड ...

चिखली येथे कोरोना लसीकरण
मूल : तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र राजाेली उपकेंद्र चिखली यांच्या वतीने कोविड १९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी कोरोना या महामारीवर कसा आळा घालता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. कोरोना या रोगाचा वाढत असलेला प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे व सतत मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले. यावेळी चिखलीचे सरपंच नंदू नैताम, उपसरपंच दुर्वास कडस्कर, माजी सरपंच विश्वनाथ काकडे, प्रमोद कडस्कर, साईनाथ मंडलवार, वैद्यकीय अधिकारी अश्विनी गोरे, डॉ. आशमा शेख, आरोग्य सहायक जे. एस. बोरकुटे, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक ए. जी. म्हस्के आरोग्य, ए. जी. मेश्राम मुत्यालवार, ग्रामपंचायत सदस्य राकेश जोलमवार, आशा वर्कर व गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते.