कोरोनाने ‘रांगोळीचा स्वामी’ हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST2021-04-21T04:27:54+5:302021-04-21T04:27:54+5:30

तोहोगाव : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत कला शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना आपल्या कुंचल्यातून आणि रांगोळीतून अवर्णनीय ...

Corona lost the 'lord of rangoli' | कोरोनाने ‘रांगोळीचा स्वामी’ हिरावला

कोरोनाने ‘रांगोळीचा स्वामी’ हिरावला

तोहोगाव : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत कला शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना आपल्या कुंचल्यातून आणि रांगोळीतून अवर्णनीय रांगोळी तथा चित्र साकारून नावलौकिक मिळविला. विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या कलात्मक स्वभावामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांचे लाडके असलेले स्वामी साळवे यांचे कोरोना काळातील जाणे सर्वांसाठी दुःखदायक ठरले आहे.

त्यांच्या अशा मृत्यूने एक चांगला ग्रामीण कलाकार, मित्र, शिक्षक असलेला सवंगडी हरपला, अशी भावनिक प्रतिक्रिया तोहोगाववासीयांकडून व्यक्त होत आहे.

मूळचे गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील स्वामी साळवे कला शिक्षक म्हणून कोठारी येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते. दरम्यान तीन दिवस अगोदर अचानक तब्येत बिघडली म्हणून त्यांची तपासणी केली असता ऑक्सिजन कमी असल्याने तत्काळ चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु चंद्रपुरात त्यांना बेड मिळाला नाही. म्हणून तेलंगणातील मांचेरीयल येथे भरती करण्यात आले होते. दरम्यान त्यांचे शुगर लेव्हलही कमी झाले आणि दुर्दैवाने १८ एप्रिल रोजी रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात लहान दोन मुले, पत्नी, आई, भाऊ असा आप्त परिवार आहे.

बॉक्स

बालपणापासूनच चित्र काढण्याचा छंद

लहानपणापासूनच चित्र काढण्याचा छंद असणाऱ्या स्वामीने कला शिक्षण घेतले आणि कोठारी येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी मिळविली. तरीपण विविध स्पर्धेतून रांगोळीतून व कुंचल्यातून हुबेहूब जिवंत दिसावा, असे चित्र काढीत होते. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. थ्रीडी चित्र प्रकार काढण्याची सुरुवातही केली होती. परंतु नियतीने वेगळाच डाव मांडला आणि मृत्यू ओढविला, रांगोळीतून, कुंचल्यातून चित्र काढणारा ग्रामीण भागातील ‘रांगोळीचा स्वामी’ हरपला, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Corona lost the 'lord of rangoli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.