कोरोना अ‍ॅक्टीव्ह रूग्ण एक हजार पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:23+5:302021-03-19T04:27:23+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २५ हजार २६४ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ८६४ झाली आहे. ...

Corona active patients cross one thousand! | कोरोना अ‍ॅक्टीव्ह रूग्ण एक हजार पार!

कोरोना अ‍ॅक्टीव्ह रूग्ण एक हजार पार!

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २५ हजार २६४ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ८६४ झाली आहे. सध्या एक हजार ११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार ६१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख १२ हजार २५२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील अरविंद नगरात राहणाऱ्या ६७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात ४०७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३६८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण सर्वच तालुक्यातुन आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपुरात ५३ तर भद्रावतीत १४ पॉझिटिव्ह

आज बाधित आढळलेल्या १३६ रूग्णांमध्ये चंद्रपूर क्षेत्रातील ५३, चंद्रपूर तालुका १२, बल्लारपूर आठ, भद्रावती १४, ब्रह्मपुरी ११, नागभीड आठ, सिंदेवाही तीन, मूल तीन, सावली दोन, राजुरा एक, चिमूर सात, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या नऊ रूग्णांचा समावेश आहे.

Web Title: Corona active patients cross one thousand!