लोकसंख्या नियंत्रित म्हणजे सुखी कुटुंब

By Admin | Updated: July 29, 2014 23:43 IST2014-07-29T23:43:47+5:302014-07-29T23:43:47+5:30

जागतिक पातळीवर भारताची लोकसंख्या चवथ्या स्थानावर आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल आहे. नागरिकांनी सकारात्मक भूमिका पार पाडल्यास लोकसंख्या

Controlling population means happy family | लोकसंख्या नियंत्रित म्हणजे सुखी कुटुंब

लोकसंख्या नियंत्रित म्हणजे सुखी कुटुंब

लोकसंख्या स्थिरता कार्यक्रम : दोन कन्या अपत्य मातांचा सत्कार
बल्लारपूर : जागतिक पातळीवर भारताची लोकसंख्या चवथ्या स्थानावर आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल आहे. नागरिकांनी सकारात्मक भूमिका पार पाडल्यास लोकसंख्या नियंत्रित राहून प्रत्येकांना सुखी कुटुंबाचे समाधान मिळणार असल्याचे मत रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष रामभाऊ टोंगे यांनी लोकसंख्या स्थिरता कार्यक्रमात व्यक्त केले.
तालुक्यातील विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लोकसंख्या स्थिरता पंधरवडा कार्यक्रमाचे औचित्य साधून दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या मातांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम, पंचायत समिती सदस्य अनेकश्वर मेश्राम, सरपंच बंडू गिरडकर, संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कुकडपवार, डॉ. अश्विनी बेले यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद रामभाऊ टोंगे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना हरीश गेडाम म्हणाले, वंशाचा दिवा म्हणून आपण मुलाचा आग्रह करतो. यामुळे स्त्री भृणहत्येचे प्रमाण वाढले आहे. गर्भ निदान चाचणीचा प्रकार याला कारणीभूत आहे. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी, असे बोलून दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या मातांचा त्यांनी गौरव केला. दरम्यान, सावित्रीबाई फुले कन्या योजनेतील लाभार्थी सुनिता चंदू मुडे व गांगुला किशोर मालकर यांना धनादेश व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
दोन कन्या अपत्यांवर शस्त्रक्रिया करुन नवा आदर्श निर्माण करणाऱ्या पिंकी बादल हजारे, माधुरी रविंद्र धुलकर व शालु बंडू मठ्ठे यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू प्रदान करुन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ, अनिल कुकडपवार यांनी आरोग्य विभागातील योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. अश्विनी बेले यांनी केले.
संचालन ज्योती गेडाम यांनी तर आभार रमेश मेश्राम यांनी मानले. अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश वाघमारे, रिता मिरपगार, गजभिये, वाघमारे , कांता मून यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Controlling population means happy family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.