नायब तहसील कार्यालयावर मंडल अधिका-यांचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:42+5:302020-12-22T04:27:42+5:30
घुग्घुस : येथील नायब तहसीलदार कार्यालय गेल्या वर्षीपासून रजेवर आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांच्या कार्यालयावर मंडळ ...

नायब तहसील कार्यालयावर मंडल अधिका-यांचा ताबा
घुग्घुस : येथील नायब तहसीलदार कार्यालय गेल्या वर्षीपासून रजेवर आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांच्या कार्यालयावर मंडळ अधिकारी यांनी आपले कार्यालय थाटले. नागरिकांची अनेक कामे प्रलंबित आहेत.
घुग्घुस येथे १७ ऑगस्ट ९९ ला नायब तहसीलदार कार्यालय अस्तिवात आले. एक दोन नायब तहसिलदार बगळता अन्य नायब तहसीलदार चंद्रपूर तहसील कार्यालयातून कामकाज चालविले. दरम्यान, येथे कायमस्वरूपीदार मिळावे, म्हणून अनेकदा पाठपुरावा झाला. मार्च २००८ मध्ये तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात कुलूप ठोको आंदोलन झाले. गेल्या एक दोन वर्षे आठवड्यातून दोन दिवस एकदोन तास कार्यालयात नायब तहसिलदार कामकाज करीत होते. सहा महिन्यांपासून तहसीलदार कार्यालयातील खोली मंडळ अधिकारी यांनी आपले कार्यालय थाटले. घुग्घुस नायब तहसीलदार कार्यालयाचे अस्तित्व राहिले नाही. नायब तहसीलदार कार्यालयाला प्रशासकीय मंजुरी नसल्याने चंद्रपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांकडे अतिरिक्त नायब तहसीलदारां कडे कामकाज सोपविण्यात येत होता. यामुळे आठवड्यातून एक दोन दिवस ते नायब तहसीलदार वेळ देत होते. एक कारकून,एक शिपाई यांच्या भरशावर नायब तहसीलदार कार्यालय होते. घुग्घुस हे शहर चंद्रपूर तहसीलदार कार्यालय २८ किमी अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या ४५ हजार असून औद्यगिक व राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण गाव आहे. नायब तहसीलदार पद मंजूर असून कार्यरत नाही. त्यामुळे नागरिकांची अनेक प्रलंबित आहेत.