कंटेनर रस्त्यावरील चालत्या कारवर पलटला, चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 18:10 IST2021-12-15T18:03:28+5:302021-12-15T18:10:29+5:30
बल्लारपूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लेनमध्ये असलेल्या चालत्या कारवर पलटला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला. मात्र, कंटेनरचालक जखमी झाला.

कंटेनर रस्त्यावरील चालत्या कारवर पलटला, चालक जखमी
चंद्रपूर : बल्लारपूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लेनमध्ये असलेल्या चालत्या कारवर पलटला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला. मात्र, कंटेनरचालक जखमी झाला. त्याला तत्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
ही घटना बुधवारी सकाळी ६.३० वाजता विसापूर टोलनाका बल्लारपूर रोडवरील बॉटनिकल गार्डन लगतच्या दर्ग्याजवळ घडली. दर्ग्याजवळील महामार्गाने एक कंटेनर (एमएच ४९ एटी ६६५६) पेपरचे पार्सल घेऊन बल्लारपूर चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान, कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वळण रस्त्यावर तो पलटी होऊन लगतच्या दुसऱ्या रोडच्या लेनमध्ये चालत्या कारवर आदळला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला व या अपघातात कंटेनरचालक गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी जाऊन कंटेनरचालकाला तत्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलवले व वाहतूक पोलिसांच्या मदतीने कंटेनरला महामार्गावरून काढून वाहतूक सुरळीत केली.