Consumers everywhere complain of onion prices, but mobile chat about mobile recharge | कांद्याच्या भाववाढीवरून सर्वत्र आक्रोश, मोबाईल रिचार्जबाबत मात्र ग्राहक गप्प
कांद्याच्या भाववाढीवरून सर्वत्र आक्रोश, मोबाईल रिचार्जबाबत मात्र ग्राहक गप्प

ठळक मुद्देजनजागृतीची गरज : सुज्ञ नागरिक व्यक्त करताहेत आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. स्वयंपाकघरातील कांदा हा आवश्यक घटक असल्याने त्याची भाववाढ सर्वसामान्य जनतेच्या चिंतेचा विषय आहे. त्याविरुद्ध आवाज उठणे समजण्यासारखे असले तरी काही कंपन्यांनी मोबाईल रिचार्जमध्ये मोठीे वाढ केली आहे. मोबाईलदेखील आवश्यक घटक आहे. एका कुटुंबात तीन ते चार मोबाईल आहेत. रिचार्जमध्ये एवढी मोठी वाढ होऊनही समाजामध्ये या विरोधात कुठेही आक्रोश नाही. मात्र काद्यांच्या भावाबाबतच एवढी चर्चा का, असा प्रश्न आता काही सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.
कांद्याच्या भावाने शंभरी पार केली, या भाववाढीने महिलांच्या डोळ्यात पाणी आले. कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. सामान्यांच्या जेवणातून कांदा हद्दपार होत आहे. यासाठी या भावनाढीविरोधात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी आवाज उठविला आहे. या भाववाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. यासाठी आक्रोश करणे समजण्यासारखे आहे. यामुळे कांद्याच्या अवैध साठेबाजांना आळा बसेल व कांदा स्वस्त होऊ शकतो मात्र, याच दिवसात काही मोबाईल कंपन्यांनी मोबाईल रिचार्जमध्ये मोठी वाढ केली आहे. विद्यमान परिस्थितीत मोबाईल फोनदेखील आवश्यक घटक झाला आहे. प्रत्येक घरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्वतंत्र मोबाईल फोन आहे. रिचार्जमध्ये भाववाढ झाल्याने प्रत्येक कुटुंबाना मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. कांद्याचे वाढलेले भाव भविष्यात कमी देखील होऊ शकतात, अनेकदा शेतकऱ्यांना कांद्याच्या पडलेल्या भावामुळे कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागतो.
यावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी कुणीच पुढे येत नाही. मोबाईल रिचार्जचे वाढलेले भाव भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही. मग, तात्पुरत्या कांद्या भाववाढीविरोधात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनआक्रोश पाहायला मिळत असताना मोबाईल रिचार्ज भाववाढीविरोधात समाजामध्ये चकार शब्द देखील ऐकायला येत नाही. प्रत्येक जण शेतकºयांप्रती सहानुभूती दाखवितात. मात्र भाव वाढीनंतर एवढा आक्रोश कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Web Title: Consumers everywhere complain of onion prices, but mobile chat about mobile recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.