ग्राहकांच्या प्रबोधनाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST2021-03-17T04:29:18+5:302021-03-17T04:29:18+5:30

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकवेळा साहित्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. आजच्या स्थितीत अनेकांच्या घरात फ्रीज, टिव्ही, मोबाईल, वॉशिंग मशिन, ...

Consumer awareness needs | ग्राहकांच्या प्रबोधनाची आवश्यकता

ग्राहकांच्या प्रबोधनाची आवश्यकता

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकवेळा साहित्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. आजच्या स्थितीत अनेकांच्या घरात फ्रीज, टिव्ही, मोबाईल, वॉशिंग मशिन, स्वयंपाकी गॅस, कुलर, ओव्हन, विद्युत इनवर्टर, दुचाकी व चारचाकी आदी मोठ्या प्रमाणात आढळतात. उच्चभ्रू व नोकरदार वर्गाकडे तर यातील बहुतेक वस्तु असतातच. मात्र त्यातील अनेक वस्तुंची निगा, सुरक्षितता व अचानक धोकादायक स्थिती निर्माण झाल्यास कशी व कोणती तात्काळ उपाययोजना करायची, याबाबत अनेकांना कोणतीही माहिती नसते. त्यामुळे ज्या उपाययोजना करणे धोक्याच्या असतात, त्याच आपण नकळत करून बसतो. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागते. अनेकदा काहीतरी बिघाड उत्पन्न होत असल्याचे जाणवत असतानासुद्धा दुर्लक्ष करतो. त्यामुळे इलेक्ट्रानिक वस्तूंच्या सुरक्षेबाबत गावात तसेच शहरातसुद्धा प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Web Title: Consumer awareness needs