माणिकगड सिमेंट कंपनीकडून पालकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:59+5:302021-03-08T04:26:59+5:30

कोरपना : कोरोनामुळे लोकांच्या हातचे काम गेले व आर्थिक मंदी पसरली. यातून पाल्यांचे पालकसुद्धा आर्थिकदृष्ट्या हतबल झाले. त्यामुळे पाल्यांचे ...

Consolation to parents from Manikgad Cement Company | माणिकगड सिमेंट कंपनीकडून पालकांना दिलासा

माणिकगड सिमेंट कंपनीकडून पालकांना दिलासा

कोरपना : कोरोनामुळे लोकांच्या हातचे काम गेले व आर्थिक मंदी पसरली. यातून पाल्यांचे पालकसुद्धा आर्थिकदृष्ट्या हतबल झाले. त्यामुळे पाल्यांचे शैक्षणिक शुल्क कपात करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी माणिकगड सिमेंट व्यवस्थापनाकडे केली. यासंदर्भात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी माणिकगड सिमेंट कंपनीशी चर्चा करून या संदर्भात तोडगा काढण्याची विनंती केली.

माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापनाने शाळेच्या शुल्कात २५ टक्क्यांनी कपात केल्याने पालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करण्याकरिता आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्ष सविता टेकाम, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे व पालक मंडळींनी सहभाग घेतला होता.

Web Title: Consolation to parents from Manikgad Cement Company