बोअरवेल संचालकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:36+5:302021-02-05T07:42:36+5:30
विनाअनुदानित शिक्षकांची उपासमार चंद्रपूर : मागील १० ते १५ वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे काम करणारे शिक्षक इतर छोटा-मोठा व्यवसाय करून ...

बोअरवेल संचालकांना दिलासा
विनाअनुदानित शिक्षकांची उपासमार
चंद्रपूर : मागील १० ते १५ वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे काम करणारे शिक्षक इतर छोटा-मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मात्र या वर्षी त्यांचे उत्पन्न बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
-----
कर्जासाठी जाचक अटी रद्द करा
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे सर्वाधिक फटका लहान व्यावसायिकांना बसला. धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये बंद होती. त्यामुळे यावर अवलंबून असणारे छोटे व्यवसाय पूर्णत: डबघाईला आले आहेत. या व्यवसायांना पूर्वपदावर आणण्यासाठी छोट्या व्यावसायिकांना कोणत्याही जाचक अटी न लावता बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
चाराटंचाईचा
शेतकऱ्यांना फटका
गोंडपिपरी : या वर्षी काही तालुक्यांतील शेतकऱ्यांना चाऱ्याची टंचाई आहे. घरी उपलब्ध असलेला धान व सोयाबीन कुटार संपत आहे. त्यामुळे जनावरांना चारा कुठून आणावा, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीलाही काढली आहेत.