परवानाधारक देशी दारूच्या दुकानाला गावकऱ्यांची सहमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:31 IST2021-08-22T04:31:13+5:302021-08-22T04:31:13+5:30
पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी असताना गावात मात्र बिनबोभाटपणे अवैध दारू विक्री सुरू होती. या बाबीला कुणाचीही हरकत नव्हती. मात्र, ...

परवानाधारक देशी दारूच्या दुकानाला गावकऱ्यांची सहमती
पूर्वी संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी असताना गावात मात्र बिनबोभाटपणे अवैध दारू विक्री सुरू होती. या बाबीला कुणाचीही हरकत नव्हती. मात्र, आता शासनाने दारू बंदी हटविली असताना गावात जुन्याच ठिकाणी परवानाधारक दारूचे दुकान सुरू होण्याच्या मार्गावर असताना काही लोकांनी विरोध दर्शवणे सुरू केले आहे. यावर आक्षेप घेत गावातील बहुसंख्य महिलांनी व गावकऱ्यांनी परवानाधारक देशी दारूचे दुकान जुन्याच ठिकाणी सुरू करावे. यामुळे गावातील अवैध दारू विक्रीला आळा बसेल आणि शासनालाही महसूल प्राप्त होईल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबतचे निवेदन सरपंच देवेंद्र गेडाम यांना शुक्रवारी दिले. यावेळी शिष्टमंडळात मीराबाई कापेवार, मुखराबाई रोगेवार, लक्ष्मीबाई कन्नावार, मल्लाजी कन्नावार, नंदेश्वर देवेवार, राकेश कापेवार, मुखरू पोतराजवार, दिनेश चौदेवार, मंगला डोर्लीकर, दुर्गा डोर्लीकर, नम्रता नेवारे आदींची उपस्थिती होती.