शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:25+5:30

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपूर (ग्रामीण)चे जिल्हा अधिवेशन पोंभुर्णा येथील राजराजेश्वर सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. वाजपेयी, स्वागताध्यक्ष म्हणून न.प.च्या अध्यक्षा श्वेता वनकर तर प्रमुख अतिथी म्हणून राधेशाम पंचबुद्धे, अल्का आत्राम, सुभाष गोतमारे, शेंद्रे, सुनीता मॅकलवार, एकनाथ थुटे, मधुकर मुप्पीडवार, विलास बोबडे, रामदास गिरडकर, अमोल देठे, अधिवेशनाचे संयोजक दिलीप मॅकलवार आदींची उपस्थिती होती.

Conscientious injustice to teachers | शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय

शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय

ठळक मुद्देनागो गाणार : पोंभूर्णा येथे पार पडले शिक्षकांचे जिल्हा अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : जुनी पेंशन योजना हा ज्वलंत विषय आहे. यासाठी माझा लढा सुरु आहे. शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असून जुनी पेंशन योजना जोपर्यंत लागू होत नाही. तोपर्यंत आमदारकीची पेंशन घेणार नाही. शिक्षक आमदार हा शिक्षकाच्या हक्कासाठी सदैव कार्यरत असला पाहिजे, असे मत आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपूर (ग्रामीण)चे जिल्हा अधिवेशन पोंभुर्णा येथील राजराजेश्वर सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. वाजपेयी, स्वागताध्यक्ष म्हणून न.प.च्या अध्यक्षा श्वेता वनकर तर प्रमुख अतिथी म्हणून राधेशाम पंचबुद्धे, अल्का आत्राम, सुभाष गोतमारे, शेंद्रे, सुनीता मॅकलवार, एकनाथ थुटे, मधुकर मुप्पीडवार, विलास बोबडे, रामदास गिरडकर, अमोल देठे, अधिवेशनाचे संयोजक दिलीप मॅकलवार आदींची उपस्थिती होती.
कायदा बदलल्याशिवाय शिक्षण योजना अंमलात येत नाही. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आपण आवाज उठवला आहे. शासन नवनवीन निर्णय घेत आहे त्यामुळे शिक्षकांनी आता जागृत राहणे गरजेचे आहे. संघटनेशी जुळून राहिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर विविध शिक्षक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर यांनी संघटनेचे गित सादर केले. प्राथमिक विभागाचे अहवाल वाचन अमोल देठे तर माध्यमिक विभागाचे अहवाल वाचन रामदास गिरटकर यांनी केले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, संचालन महिला आघाडी प्रमुख संध्या गिरटकर यांनी तर आभार जिल्हा सहकार्यवाह दिलीप मॅकलवार यांनी मानले. अधिवेशनाला जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी अनुदानित, विनाअनुदानीत, आश्रमशाळा, कॉन्व्हेंट, प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाची सांगता पसायदाणाने झाली.

Web Title: Conscientious injustice to teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक