शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

कोरपना येथे काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:41 PM

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार महाराष्ट्रभर सुरू असलेल्या महागाईविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन कोरपना तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ....

ठळक मुद्देशासनाचा निषेध : वाढत्या महागाईचा केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार महाराष्ट्रभर सुरू असलेल्या महागाईविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन कोरपना तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालय कोरपना येथे गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.केंद्र व राज्य शासनाच्या अकार्यक्षमतेमुळेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस महागाई उच्चांक प्रस्थापित करीत आहे. महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना स्वस्त दारात वस्तू उपलब्ध करून देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत असलेल्या भाजपा सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. जनतेचे अच्छे दिनाचे स्वप्न धूसर झाले आहे. सरकारच्या या अकार्यक्षमतेविरोधात आणि वेगाने वाढणाºया महागाईविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांच्या आदेशानुसार काल आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर गोडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, सभापती शाम रणदिवे, माजी जि.प. सदस्य उत्तम पेचे, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, विनाताई मालेकर, कल्पना पेचे, उपसभापती संभाजी कोवे, नगराध्यक्ष नंदा बावणे, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, विजय ठाकूरवार, उपनगराध्यक्ष मसूद अली, गडचांदूर येथील गटनेते पापय्या पोन्नमवार, घनश्याम नांदेकर, विलास मडावी, झीबल जुमनाके, प्रभाकर क्षीरसागर, अशोक आस्कर यांच्यासह कोरपना तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अल्पसंख्यांक सेल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावरकोरपना : वाढलेले विजदर, सतत होत असलेले भारनियमन, डिजेल-पेट्रोल दरवाढ यामुळे वाढणाºया महागाईच्या निषेधार्थ कोरपना तालुका शिवसेनेच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन देऊन तहसीलदाराला निवेदन देण्यात आले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनार्थ युवासेना जिल्हा प्रमुख सचिन भोयर, उपजिल्हा प्रमुख धनंजय छाजेड, तालुका प्रमुख प्रकाश खनके यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय कोरपना येथे धरणे दिले. सतत वाढत असलेली महागाई, वाढलेले वीजदर, यामुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. प्रत्येक बाबतीत भाजपा सरकार अपयशी ठरली असून येणाºया काळात जनता भाजपा सरकारला त्यांची जागा दाखविणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख धनंजय छाजेड यांनी म्हटले. युवासेनेचे जिल्हाप्रमुख सचिन भोयर यांनीही सरकार विरोधात परखड मत व्यक्त केले. यावेळी नत्थू मत्ते, राजू मुळे, सुनील गोरे, मनोज इटनकर, नितिन डाखरे, नितिन महागोकार, नितिन धांडे, दादाजी मोहुर्ले तसेच तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.