पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसची धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:27 IST2017-09-20T23:27:36+5:302017-09-20T23:27:46+5:30
केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल गॅस व वीज बिलात भरमसाठ वाढ केली. यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.

पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसची धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा: केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल गॅस व वीज बिलात भरमसाठ वाढ केली. यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस आणि विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने पंचायत समिती चौक राजुरा येथे जनतेला पुष्प प्रदान करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी माजी सभापती मारोतराव जेनेकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, माजी तालुका अध्यक्ष अॅड. अरूण धोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आबाजी ढुमने, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, साईनाथ बुचे, बामनवाडाचे उपसरपंच सर्वानंद वाघमारे, सुधाकर लांडे, अजय मानवटकर, राधाबाई आत्राम, जसविंदरसिंग धोतरा, मसुद अहमद, राजू सोमलकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.