शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा स्नेहमिलन व सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:20 IST

गेल्या काही वर्षात काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद झाले. त्यामुळे पक्षाला सर्वच पातळ्यांवर पराभव पत्करावा लागत आहे. प्रत्येक नेता वेगळी चूल मांडत असल्याने कार्यकर्त्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनिष्ठावान कार्यकर्त्यांचा सत्कार : पक्ष मजबुतीकरणासाठी प्रयत्न करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या काही वर्षात काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद झाले. त्यामुळे पक्षाला सर्वच पातळ्यांवर पराभव पत्करावा लागत आहे. प्रत्येक नेता वेगळी चूल मांडत असल्याने कार्यकर्त्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे जुन्या निष्ठावंत काँग्रेस कार्यकत्यांचा स्नेहमिलन सोहळा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा रेडक्रॉस सोसायटी सभागृहात नुकताच पार पडला.कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शफीक अहमद, जिल्हा काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सुधाकर कातकर, आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते २५ वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या मजबूती व बळकटीसाठी परिश्रम करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या जुन्या माजी वॉर्ड अध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमुर्र्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.काँग्रेसमधील अंतर्गत भांडणामुळे मागील लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतरही पक्षांतर्गत भांडणे मिटताना दिसत नाही. त्याच्या झळा पक्षाच्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोसाव्या लागत आहे. पक्षसंघटना मजबूत करून सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान होण्यासाठी नेत्यांनी एकत्र यावे म्हणून चंद्रपूर शहरातील काही जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्थानिक जटपुरा गेटसमोर एक दिवसीय सद्बुद्धी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय सदर स्नेहमिलन मेळाव्यात घेण्यात आला. यावेळी काँगे्रसच्या नेत्यांनी मार्गदर्शनात पक्ष वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी संजय रत्नपारखी, इकबाल भाई, केशव रामटेके, एजाज अहमद, ुदय बुद्धावार, अनु दहेगावकर, बबन वानखेडे, हरीनाथ यादव, सैयद फारूख, के. अनंतराव, रामनिवास विश्वकर्मा, राजू भामद्रे, अनिता माऊलीकर, अन्ना पोळे, सूर्यभान डांगे, कुरदुल्ला लिंगय्या, रामभाू राऊत, बंडू नगराळे, ज्योती बेंदले, येडला राजम, बाबुराव राऊत, विजय वासेकर, गीता येनप्रेड्डीवार, बंडोपंत तातावार, शंकर झाडे, दुर्गेश कोडाम, चंद्रकांत राऊत, सागोरिका शहा, प्रज्योत नळे, सुरेश दुबे, अशोक मुळेवार, विजय कोरेवार, किशोर बोभाटे, शंकर बल्लेवार, वंदना भागवत, रसिका गोंगले, मीना आरमुल्ला, विजय पोहणकर, सुरेश दुर्शेलवार, गोपी मित्रा, चंदू मोडक, किशोर अटकापूरवार, राजू झाडे, घनश्याम चहारे, अनिल रामटेके, प्रमोद भगतकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.